ग्रामपंचायत येडे मच्छिंद्र

ता. वाळवा - जि. सांगली

ग्रामपंचायत

इतिहास

आमच्या गावाचा गौरवशाली इतिहास

आमचा वारसा

१- जगतगुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज याच्या पदपर्शीने पावन झालेली भुमी म्हणुन आध्यात्मिक वारसा येडेमच्छिंद्र गावाला लाभला.
२- सातारा प्रतिसरकार प्रेणेते माजी खासदार क्रांतिसिंह नाना रामचंद्र पाटील यांचे गाव येडेमच्छिंद्र.
३- गावामध्ये सर्व जातीधर्माचे लोक राहतात. गावात कधीही जातीय दंगल झालेली ‌नाही.
४- गावाला शेतीची परंपरा आहे; ८०% क्षेत्र हे पाणस्थळ आहे.
५- गावाला १९७२ चा दुष्काळानंतर कधीही नैसर्गिक आपत्ती आलेली नाही.
६- गावामध्ये परंपरागत उत्सव खेळीमेळीने पार पडतात.
७- गावाला क्रिडा क्षेत्रात राजस्तरीय खेळाडू मिळाले आहेत; प्रामुख्याने कुस्ती आणि कबड्डी या खेळामध्ये विशेष यश मिळवले आहे.
८- महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ येडेमच्छिंद्र गावात रोवली गेली.
९- गावामध्ये विकास सोसायटी, बँक, शाळा, आरोग्यकेंद्र यांसारखी सरकारी कार्यालये आहेत.
१०- गावामध्ये सेवानिवृत्त आणि कार्यरत शिक्षकांची संख्या उल्लेखनीय आहे.
११- गावात हिंदू देवतांची मंदिरे तसेच मशीद आहे.
१२- दरवर्षी पंढरपूर आषाढी वारीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन होते; यात तरुण वारकऱ्यांचा सहभाग जास्त असतो.
१३- वेगवेगळ्या जयंती व पुण्यतिथीच्या औचित्याने अन्नदानाचे आयोजन केले जाते.

ऐतिहासिक कालरेखा

१९७२

पहिली पक्की रस्तादुष्काळ – शेवटची मोठी नैसर्गिक आपत्ती

या कालावधीत आमच्या गावाची स्थापना झाली आणि पहिले स्थायिक येथे वस्ती करू लागले.

ऐतिहासिक ठिकाणे

प्राचीन मंदिर

गोरक्षनाथ मंदिर

स्वातंत्र्यसैनिक स्मारक

क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक